महाराष्ट्र

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याचं खुलं आव्हान

Published by : Lokshahi News

प्रतिनिधी : मयुरेश जाधव

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे. होळीच्या दिवशी सुरु असलेल्या आरती दरम्यान दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे आज मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवून अटक केली आणि सुटका केली. मात्र यानंतर येत्या २७ एप्रिलला येणाऱ्या पौर्णिमेला आपण मलंगगडावर आरतीसाठी जाणारच, अशी घोषणा अविनाश जाधव यांनी केली आहे.

हिंदू भाविक दर पौर्णिमेला मलंगगडावर आरती करण्यासाठी जात असतात. मात्र होळीच्या दिवशी झालेल्या या घटनेनंतर २७ एप्रिलला येणाऱ्या पौर्णिमेला आपण मलंगगडावर आरतीसाठी जाणारच, अशी घोषणा अविनाश जाधव यांनी केली असून हिम्मत असेल तर आपल्याला धक्काबुक्की करून दाखवावी, असं आव्हान दिल आहे.

नेमकं काय झालं होतं मलंगगडावर ..?
हिंदू भाविक दर पौर्णिमेला मलंगगडावर आरती करण्यासाठी जात असतात. मात्र होळीच्या दिवशी हिंदू भाविक आरती करत असतानाच अचानक काही मुस्लिम भाविकांनी तिथे येऊन घोषणाबाजी केली, तसंच पोलिसांनाही धक्काबुक्की करत आरती बंद पडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच मलंगगड परिसरात मोठा तणाव निर्माण आला. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले. आता अशा परिस्थितीमध्ये अविनाश जाधव यांना मलंगगडावर आरतीसाठी जाऊ दिलं जातं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...