हिंदू सण साजरे करण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या मनसे सैनिकांना दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र मनसे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शैलेश बिडवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उभारून त्या फोडण्यासाठी कार्यकर्त्यांचे मनोरे उभे केले.
पडघा येथे बाजारपेठेत मनसे तर्फे उभारलेली दहीहंडी दोन थराचा मनोरा उभारून कार्यकर्त्यांनी फोडून राज्य शासनाचा निषेध नोंदवला आहे.