वैभव बालकुंदे | लातूर जिल्ह्यातील आज महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मांगण्यांसाठी आज उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या शेतकरी सेनेने गाढून घेत आंदोलन केले. या आंदोलनाची शहरभर चर्चा होती.
स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू करा,16 तास थ्री फेज लाईट पुरवठा करा, लातुर जिल्ह्यातील सन २०१९-२० वर्षातील सोयाबीन पिकवीमा शेतकर्यांना द्यावा, तसेच एका शेतकर्याने तहसिल कार्यालयात फाशी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करुन शेतकर्यास आत्महत्येस प्रवृत करणार्या तहसिल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक झाली होती. या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला गाढून घेत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करत मनसेने आंदोलन केले.