महाराष्ट्र

आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचा भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फसवणूकीचा गुन्हा दाखल

Published by : Lokshahi News

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य, ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि फसवणूकीचा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेतकरी महादेव वाघमारे यांच्या शेत जमिनीतून गेलेल्या पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर केला. या प्रकरणी पडळकर बंधूंच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

झरे येथील महादेव वाघमारे आणि त्यांच्या बहिणीकडून आमदार पडळकर शेत जमीन विकत घेतली होती. विकलेल्या शेत जमिनीचे पैसे दिले तर नाही, उलट पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर केला अशी तक्रार देण्यात आली आहे.

आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद यांनी गट नंबर (624 556 व 557/1) मधील अकरा एक शेत जमीन सन 2008 मध्ये दहा लाख पन्नास हजार रुपयाचा तोंडी व्यवहार ठरवला होता. यावेळी पडळकर यांनी एक लाख रुपये दिले होते. या तोंडी व्यवहाराचा दस्त २१ मार्च २०११ रोजी झाला. त्यावेळी ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे स्टॅम्प ड्युटी फी कमी करण्याचे भासवून खरेदी दस्त करते वेळी फक्त चार लाख 75 हजार रुपये दिले. असे एकूण सदर कुटुंबाला पाच लाख 75 हजार रुपये पडळकर बंधूंनी दिले होते. प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार दहा लाख पन्नास हजार रुपयाला ठरला होता. पडळकर बंधु त्यांना चार लाख 75 हजार रुपये देणार होते. ते आज अखेर त्यांना दिलेले नाहीत.

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड