आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये काढलेल्या मोर्चातील मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर बच्चू कडू मुंबईसाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. या चर्चेत शेतकरी, दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.