Ravindra Chavan Team Lokshahi
महाराष्ट्र

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला लोकलने प्रवास

राज्याचा एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री सर्वसामान्य रेल्वे प्रवाशासारखा लोकलमधून प्रवास करतो आहे. याची इतर सर्व प्रवाशांना कल्पनाही नव्हती.

Published by : Sagar Pradhan

निसार शेख|चिपळूण: सीएसटी स्टेशनवर रविवारची सायंकाळी सात अठराची बदलापूर लोकल फर्स्ट क्लासच्या डब्यात चढलो समोर सात आठ गणवेशातले पोलीस सुरक्षा कर्मचारी दिसले. कोपऱ्यात लक्ष गेलं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बसलेले होते. ते डोंबिवलीला राहतात. संध्याकाळच्या वेळी सीएसटीवरून डोंबिवलीला गाडीने रस्त्यामार्गे जाणं वेळेचा अपव्यय आहे.

तेवढ्यासाठीच सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे त्यांनी केलेला हा प्रवास चर्चेचा ठरला. रविवारचा दिवस होता. त्यामुळे डब्यात गर्दी कमी होती. इतर सर्व प्रवाशांना कल्पनाही नव्हती राज्याचा एक कॅबिनेट मंत्री सर्वसामान्य रेल्वे प्रवाशासारखा लोकलमधून प्रवास करतो आहे. दूरदर्शनचे निर्माते जयू भाटकर यांनी आपला हा रविवारचा अनुभव लोकशाही चॅनलशी शेअर केला.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news