संजय देसाई, सांगली | पुणे-बंगळुरु मार्गावर एका दाम्पत्याला अपघाताची घटना घडली होती. ही घटना पाहता राज्यमंत्री बच्चू कडू जखमींच्या मदतीला धावले. बच्चू कडू यांनी जखमींची तातडीने मदत करत, आपली शासकीय गाडी मदतीला दिली. त्यामुळे जखमीला रूग्णालयात पोहोचता आले असून वेळेत उपचार मिळाले.
इस्लामपूर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे आले होते.त्यानंतर कार्यक्रम आटपून ते पुणे-बेंगलोर मार्गावरून सातारा याठिकाणी निघाले असता.नेर्ले नजीक दुचाकीला अपघात झाला.ज्यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी प्रेम हे जखमी झाले आणि ते दोघेही रस्त्यावर पडले होते. त्याच रस्त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या गाडीचा ताफा जात होता.
यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनास हा अपघात, आला आणि त्यांनी तात्काळ गाड्यांचा ताफा थांबवण्याचे आदेश देऊन, स्वतः गाडीतून उतरून जखमी व्यक्तींजवळ धाव घेतली.दोघा जखमींना तातडीने आपल्या गाडीत बसवून तत्काळ रुग्णालयाकडे पाठवून दिलं व स्वतः दुसऱ्या गाडीने मार्गस्थ झाले.तर यानिमित्ताने मंत्री बच्चू कडू यांची माणुसकी पाहायला मिळाली.