महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली आहे.
परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन सांगितले की, आता परीक्षा पुढील वर्षी होणार असल्याची माहिती दिली आहे.