सर्वसामान्यांचे गृहस्वान पूर्ण करणाऱ्या म्हाडाचा कारभार आता पेपरलेस होणार आहे. महाडामध्ये येणारा प्रत्येक अर्ज, निवेदन चेट स्कैन करूनच त्याची फाईल संबंधित अधिका-यांकडे पाठवली जाणार आहे. त्यासाठी म्हाडा ४ नोव्हेंबरफसून ई-ऑफिस ही प्रणाली सुरू करणार आहे. त्यामुळे फाईलीसा प्रवास आणि वेळ कमी होणार असल्याने कारभाराला गती येणार असून संबंधितालाही मोठा दिलासा मिळणार आहे.
म्हाडा कार्यालयात दररोज चार-पाच हजारांहून अधिक जण आपली वेगवगेळी कामे घेऊन येतात. आपले काम ज्या विभागात आहे, त्या विभागात त्यांना सातत्याने फेल्या माराव्या लागतात. तसेच कोणती फाईल कोणाकडे गेली आहे, त्यावर काय कार्यवाही झाली याची माहिती मिळण्यास विलंब होतो, त्याची गंभीर दखल घेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जपानाल यांच्या निर्देशानुसार महाडाने आपला कारभार नैशनल इन्फॉर्मेटिक सेहाच्या मदतीने ई-ऑफिसच्या आध्यमातून पेपरलेस करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार म्हाडामधील फाईलो कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी बाहेरून येणारे पत्र, निवेदन स्कॅन करून संबंधित विभागाला पाठवले जाणार आहे. तसेब कुन्या फाईल्स आहेत, त्याही लवकरच स्कॅन केल्या जाणार आहेत. त्यामुळे म्हाडाचा कारभार आणखी गतीमान होऊ शकणार आहे.