मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज रविवारी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्यान काही गाड्या उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेवरील माटुंगा–ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान, सीएसएमटीकडून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी स्थानकाकडे येणाऱ्या सर्व गाड्या माटुंगा–ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत बोरिवली–गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच काही लोकलसेवा रद्द करण्यात येणार आहेत