मुंबई : उद्या लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, जरा थांबा. कारण उद्या रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नियमित देखभाल दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेनं मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
ठाणे कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
या कालावधीत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळ ९.५० ची वसई रोड - दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. ही मेमू कोपर- दिव्यादरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच ही मेमू दिव्यावरून न सुटता सकाळी ११.४५ वाजता कोपर ते वसई रोडदरम्यान धावणार आहे.
हार्बर मार्ग
पनवेल-वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
सकाळी ११.५ ते दुपारी ४.५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
या कालावधीत पनवेलवरून सीएसएमटी जाणारी आणि सीएसएमटीवरून पनवेल आणि बेलापूर जाणारा लोकल सेवा रद्द करली आहे.
पश्चिम मार्ग
मरिन लाइन्स ते माहिम डाऊन धीम्या मार्गावर
सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.