मध्य रेल्वे मुंबई विभाग रविवार 19 नोव्हेंबर उपनगरी रेल्वेमार्गावरील रूळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाऊन सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत धीम्या मार्गावर असतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत असेल. घाटकोपर येथून सकाळी 10:41 ते दुपारी 3:52 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9:53ते दुपारी 3:20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10:45 ते सायंकाळी 5:13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.