महाराष्ट्र

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून मेगाब्लॉक सुरू

Published by : Lokshahi News

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून (२१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट )पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना त्या-त्या स्थानकांवर विशिष्ट कालावधीसाठी थांबा देण्यात येणार आहे. रोहा ते वीर येथील दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आले असून काही स्थानकांवरील रुळ जोडण्यांच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

२१ ऑगस्टला धावणारी तिरुवअनंतपूरम- लोकमान्य टिळक स्पेशल गाडी रत्नागिरी, चिपळूण व खेड या स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. जामनगर-तिरुनेलवल्ली कोलाड किंवा माणगाव स्थानकावर २.२० तास, २२ ऑगस्टला एलटीटी-तिरुवअनंतपुरम कोलाडला एक तास थांबेल. हापा मडगाव २५ ऑगस्टला पश्‍चिम रेल्वे मार्गावर तर तिरुवअनंतपुरम-एलटीटी रत्नागिरी किंवा चिपळूणमध्ये एक तास थांबेल.

तिरुनवेल्ली-दादर वीर स्थानकात तीस मिनिटे थांबेल. जामनगर-तिरुनवेल्ली २७ ऑगस्टला पश्‍चिम रेल्वे मार्गावरील कामासाठी अडीच तास उशिराने धावणार आहे. २९ ऑगस्टला करंजाडी येथे एर्नाकुलम-अजमेर गाडी अर्धा तास थांबवण्यात येणर आहे. मडगाव-मुंबई विशेष गाडी ३० ऑगस्टला चिपळूण, खेड येथे थांबणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती