रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर रेल्वे रूळाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने रविवारी 05/06/2022 रोजी मेगा ब्लॉकचा तपशील जाहीर केला असून, पश्चिम रेल्वेने रविवारी (Sunday) जम्बो ब्लॉकचा तपशील जाहीर केला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड (Matunga to Mulund) स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. तसेच, हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल- वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेवरील ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
सकाळी १०.५० ते दुपारी ०३.४६ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावरील ब्लॉक
सकाळी १०.३३ ते दुपारी ०३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
सकाळी ११.०२ ते दुपारी ०३.५३ वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ – खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर (WESTREN LINE ) :
बोरिवली- कांदिवली UP/DN जलद मार्ग
पोयसर ब्रिज क्र. 61 च्या देखभालीचे काम करण्यासाठी, शनिवार आणि रविवारी बोरिवली आणि कांदिलवली स्थानकांदरम्यान 23.00 ते 13.30 पर्यंत UP/DN जलद मार्गांवर 14.30 तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल.