महाराष्ट्र

”ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही”

Published by : Lokshahi News

गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे. इतर बहुजन समाजातील लोकांना जो न्याय मिळतो तोच मराठा समाजातील लोकांना मिळावा अशी आमची भूमिका आहे, असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. यावेळी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही असे देखील संभाजीराजे यांनी सांगितले.

आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल," असा इशारा संभाजीराजेंनी दिला. सरकारच्या हातात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम जबाबदारी राज्यकर्त्यांची असून त्यात माझ्यासकट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची आहे. त्यामुळे समाजाला वेठीस धरू नका.

"मी काही कोणाला सुचवत नाही. मी समाजाचा घटक असून बाजू मांडत असतो. ते काय मांडतात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका त्यांना विचारा. समाजाची बाजू प्रामाणिकपणे सरकार दरबारी मांडायची ही माझी भूमिका आहे. २००७ पासून मी हे करत असून त्यासाठी मला कोणी आव्हान देऊ शकत नाही. ते काय मांडतात तो त्यांचा दृष्टीकोन आहे" अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news