मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे खासदार छत्रपती संभाजीराजे आता राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणविषयक ही भेट असणार असून राष्ट्रपती कार्यालयाकडून 2 सप्टेंबरची वेळ देण्यात आली आहे.त्यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या संदर्भात संभाजीराजे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले.
मराठा आरक्षणप्रश्नी सर्व पक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांना भेटणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी हजर राहण्यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले.