महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश; राज्यभर मराठा समाजाचा जल्लोष

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. 

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. जरांगे पाटलांची विजयी सभा आज वाशीमध्ये पार पडणार आहे. मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची वाशीत होणाऱ्या विजयी सभेत एक-दोन नव्हे तर तब्बल सात जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यांवर फुलांची उधळण करण्यात येणार आहे.

 मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठं यश मिळाल्याने मराठा समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या वतीने जल्लोष केला जात आहे.  मराठा आंदोलकांकडून पहाटेपासूनच जल्लोष करण्यात येत आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम