शिवजयंतीच्या उत्सवावर राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचपार्श्वभूमीवर नवी मुंबईतून आज (19 फेब्रुवारी ) मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांन कडून राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढवण्यासाठी वर्षा आणि मातोश्री निवासस्थानी शिवजयंती साजरी करणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. सद्यस्थितीत आम्ही शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली असती पण सरकारला निवडणुका आणि पक्षाचे मेळावे आणि परिसंवाद यात्रा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच अनावरण करताना केलेली गर्दी चालते. मग शिवाजी महाराजांची जयंती का चालत नाही? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. यावेळी नवी मुंबईतून शेकडो मराठा कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मराठे मुंबईकडे निघाले आहेत. गनिमी काव्या ने सर्व मराठा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईत होणार दाखल. महाविकास आघाडी मार्फत शिव जयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाले आहे.