मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणाचा उलगडा आता होऊ लागला आहे.एनआयएची (NIA) टीम ठाणे ATS कार्यालयात दाखल झाली आहे. सोमवार २२ मार्चच्या मध्य रात्री दमण वरून mh 05 6789 नंबरची वोल्वो गाडी ठाणे ATS ने ताब्यात घेतली होती. या गाडीचा शोध NIA देखील घेत होती. गाडी मालक अभिषेक नाथांनी (अगरवाल ) याच्या कडे असणारी ही NIA ताब्यात घेणार आहे. मनसुख प्रकरणात वाझे यांनी ज्या ज्या गाडीचा वापर केल्याच cctv फुटेज मार्फत तपासात आलेली आहे.
त्याच पद्धतीने या वोल्वो चा वापर कशा साठी झाला आहे याचा तपाससुद्धा NIA करणार आहे. याआधी सीएसएमटी भागातील सिग्नलवर रोजी मनसुख हिरेन सचिन वाझेंच्या काळ्या मर्सिडीज कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. जीपीओजवळ गाडी पार्क करुन दोघांमध्ये दहा मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. 17 फेब्रुवारीचे हे फुटेज आहे. एनआयएच्या तपासात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील अनेक गोष्टी उलगडताना दिसत आहेत.