महाराष्ट्र

सराईत चोरटे गजाआड, 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोन्याच्या व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी घरफोडी करत करायचा सोने चोरी..

Published by : Shweta Chavan-Zagade

अमझद खान | कल्याण : घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे . अभिजीत रॉय , इम्रान खान आणि रियाज खान अशी या तिन्ही चोरट्यांची नावे आहेत .अभिजीत रॉय यांच सोने गाळण्याचा व्यवसाय होता .या व्यवसायात त्याला नुकसान झालं होतं ,हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने घरफोडी करत सोने चोरून नुकसान भरून काढण्याच्या मार्ग निवडला. अभिजीत विरोधात या आधी मुंबई , मिरा भाईंदर परिसरात तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत डोंबिवलीतील सहा गुन्हे उघड केले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी ७१ तोळे सोने व २५ तोळे चांदी असे ३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच इम्रान खान आणि रियाज खान या दोघा सराईत चोरट्यांना देखील पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरलेला दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .हे दोघे एमआयडीसी परिसरात बंद असलेल्या कंपन्यांमधुन तांबे पितळ चोरी करत भंगारात विकायचे.

मानपाडा पोलिसांच्या हद्दीत दिवसा ढवळ्या घरपोडीचे प्रकार वाढले होते या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध सुरू केला .सीसीटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे एका आरोपीला अटक केली . अभिजीत रॉय अस आरोपीचं नांव आहे. मुळचा पश्चिम बंगालच्या असलेल्या अभिजित रॉय हा भायखळा परिसरातील कामाठीपुरा परिसरात राहतो. त्याने सोने गाळण्याच्या व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चोरीचा घरफोडीचा धंदा निवडला होता. मुंबई वरून डोंबिवली आणि वसई विरार पर्यत ट्रेनने प्रवास करत तो घराला कुलूप असलेले आणि फोडताना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत असे सुरक्षा रक्षक नसलेले घर निवडायचा व कडी कोयंडा उचकटून घरफोडी करत असे. त्याच्याकडून मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली .त्याच्याकडून पोलिसांनी ७१ तोळे सोने व २५ तोळे चांदी असे ३६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

त्याच्या विरोधात वसई विरार येथे १३ गुन्हे दाखल आहेत ९ महिन्यापूर्वी तो जेल मधून सुटून आला होता. तसे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले इम्रान खान आणि रियाज खान या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख १८ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .त्याच्याकडून मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत .हे दोघे एमआयडीसी मधील बंद कारखान्यातील छोट्या मोठ्या साहित्यची चोरी करून भंगारात विकून उपजीविका करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील काही दिवसात डोंबिवली एसीपी सुनील कुराडे ,मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, एपिआय अविनाश वणवे ,सुनील तारमळे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने आरोपीचा माग काढत १० गुन्हे उघडकीस आणत तीन जणांना अटक केली आरोपींकडून चोरीचा ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने पोलिससाच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result