जालना : अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र वाटू नये. आज रात्री आणि उद्या विशेष अधिवेशन बोलवलं नाही तर पाणी पिणे बंद करेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बीडची संचारबंदी मागे घ्या. आंदोलन आधी आहे, नंतर तुमची संचारबंदी आहे, असेही जरांगे पाटलांनी म्हंटले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं जे काही निर्णय घेतले त्यातील एकही मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू पण नये. समितीला राज्याचा दर्जा देऊन प्रथम अहवाल तयार करून महाराष्ट्रातील जनतेला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटले आहे. आज रात्री आणि उद्या विशेष अधिवेशन बोलवलं नाही तर पाणी पिणे बंद करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बीडमध्ये कुणी काय केलं, हे आम्हाला माहिती नाही. पण, आंदोलन आधी आहे, नंतर तुमची संचारबंदी आहे. संचारबंदी बाजूला ठेवा, एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला तर मी इथून उठेन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर येऊन बसेल. जर काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. जर कुणाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला गप बसू देणार नाही, आता सुट्टी नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बीडचा प्रकार थांबवा, अधिकाऱ्यांना तंबी द्या, असेही त्यांनी म्हंटले आहे.