मुंबई : राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडल्यानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. यावेळी 18 आमदारांचा शपथविधी झाला. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीवर आता टीका सुरु झाली आहे. शिवसेनेकडून आता या शपथविधीवर प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडखोर आमदारांच्या शपथविधीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे. त्यांनी संजय राठोड, अब्दुल सत्तार आणि विजय गावित यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राठोड यांच्यावर त्यांनी एक वेगळे ट्वीट करत भाजपला आणि राठोड यांना धारेवर धरले आहे.
नेमक काय म्हणाल्या कायंदे ?
मनिषा कायंदे या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, मंत्री संजय राठोड विरोधातील चित्रा वाघ यांचा लढा आता बोथट झालेला दिसतोय. त्यांच्या लढ्याला पक्ष श्रेष्टींनी फार मनावर घेतलेले दिसत नाही. या ट्वीटला लागुनच त्यांनी दुसरे ट्वीट केले, त्यात त्या म्हणाल्या की, संजय राठोड, अब्दुल सत्तार, विजयकुमार गावित हे आज वाजतगाजत मंत्री झाले. हीच खरी ऑगस्ट क्रांती आहे. जय हिंद असे म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर चांगलीच टीका केली. आता या टिकेनंतर भाजप आणि शिंदे गट काय प्रतिक्रिया देतील हे बघण्याजोगे आहे.