निसर्गाचं सौदर्यं असणाऱ्या माळशेज घाटात निसर्ग भ्रमती करण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या गाडीवर दरड कोसळल्याची घटना काल सांयकाळी घडली. सुदैवाने गाडी रिकामी असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचं मोठ नुकसान झालं आहे.
दोन दिवसापूर्वी जिल्हाकाऱ्यांनी आदेश काढून माळशेज घाट हा पुढील सूचना मिळेपर्यंत पर्यटकांनासाठी बंद केला आहे, मात्र तरीही अनेक पर्यटक घाटात गाडी थांबून निसर्गाचा आनंद घेत असतात हे अत्यंत धोकादायक आहे, प्रत्येक पावसाळयात माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडातात त्यामुळे पर्यटकांनी पावसाळ्यात घाटात थांबू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.