गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी मोठी दुर्घटना घडली आहे. विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ एका टँकरमधून गॅस गळती झाली आहे. या दुर्घटनेत मिलमधील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर आहे. पहाटे ही घटना घडली आहे.
मिलजवळ असलेल्या नाल्यात एका अज्ञात टँकरचा चालक विषारी केमिकल टाकत होता. यावेळी विषारी वायूची गळती होऊ लागली. जवळच असणारे मिलमधील कर्मचाऱी या विषारी वायूच्या संपर्कात आले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.