महाराष्ट्र

कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीची कारागृहात आत्महत्या

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तो येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कारागृहातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत नगर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अन्य संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात पप्पू शिंदेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. याप्रकरणी तो येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कारागृहातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरून पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली. या घटनेनंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती.

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर