नवी मुंबईतील वाशी येथे असलेल्या इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मॉल प्रशासनाला एक ईमेलद्वारे बम ठेवण्याची माहिती मिळाली. या मेलमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून मॉलमधील सर्व लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.
संपूर्ण मॉल रिकामी करण्यात आली असून सध्या बम शोध पथक आणि डॉग स्क्वॉडकडून मॉलमध्ये तपासणी सुरू आहे. सुरक्षा कारणास्तव मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या मॉलच्या परिसरात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून मिळालेल्या धमकीच्या सत्यतेची पडताळणी करण्यात येत आहे.
अद्याप कोणताही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आवश्यक तपासणी केली जात आहे.