महाराष्ट्र

'...तर मुख्यमंत्री दाढी व उपमुख्यमंत्री फडणवीस टायमिंगवर करेक्ट कार्यक्रम करतात'

Mahesh Shinde यांचा साताऱ्यात विरोधकांना इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप| सातारा : आम्ही छोटासा चिमटा घेतला. तर, अख्ख राज्य बदलून टाकलय हे तर किरकोळ आहे. आमच्या नादाला लागला. तर, आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढी पण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पण आहेत, असा इशारा बंडखोर आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी विरोधकांना दिला आहे. तर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे माझ्या अंगामधील गुणांना वाव देऊन मला मंत्रिमंडळात निश्चित संधी देतील, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. कोरेगाव शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण आमदार महेश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

महेश शिंदे बोलत म्हणाले की, कोरेगाव मतदार संघ बदलला आहे. येथील आमदार आता महेश शिंदे आहे. यापुढं गुंडगिरी दहशत माझ्या मतदार संघात सहन केली जाणार नाही. आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे. आम्ही छोटासा चिमटा घेतला. तर, अख्ख राज्य बदलून टाकलय हे तर किरकोळ आहे. आमच्या नादाला लागला. तर, आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढी पण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत, असे सांगत त्यांनी एमआयडीसीमध्ये दहशत माजवणाऱ्यांना आणि खंडणी गोळा करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

कोरेगाव शहराच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेसाठी महत्वकांक्षी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी माँफकोमधील 4 एकर जागा आमच्या ताब्यात येत आहे. मागच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी जीरवण्याच्या नादात आम्हाला ती जागा आम्हाला जाणीवपूर्वक अडीच वर्षे मिळून दिली नसल्याचे सांगत महेश शिंदेंनी अजित पवारांना टोला लागवला.

राष्ट्रवादीला विचारधारा काय आहे? याच उचल त्याचं उचल. कारखाना, सूतगिरणी खाऊन भ्रष्टाचार करणे असले राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा विसर हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांना आता पक्ष टिकवणे अवघड झाले आहे म्हणूनच रोहित पवार निवडणुका लागतील विधान करत आहेत, अशी टीकाही त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे हे भाजपच्या वाटेवर आहे. यावर बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, आम्हाला फार आनंद होईल. आम्ही त्यांना मिठीत घेऊन स्वागत करू. इतक्या दिवसांनी त्यांचे नेते चुकीचे होते याची त्यांना उपरती झाली. ते ज्या नेतृत्वाखाली काम करत होते ते चुकीचे करत होते. या मतदारसंघाला लुटत होते हे त्यांना पटलं असेल, असा खोचक टोलाही शशिकला शिंदे यांचे नाव न घेता लागवला आहे. 'सब कतार मे है' मात्र आता ठाण्याची दाढी आहे ते टायमिंग आले की कार्यक्रम करतात. मुख्यमंत्री असल्याने ते सर्वांना बरोबर घेणार, असेही त्यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, मंत्री होण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. मला आमचे नेते एकनाथ शिंदे हे माझ्या अंगामधील गुणांना वाव देऊन मला मंत्रिमंडळात निश्चित संधी देतील, असे सांगत मंत्री पदाची इच्छा आमदार महेश शिंदे यांनी बोलून व्यक्त केली. रामराजेंना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल मी छोटा आमदार आहे. खळ उथळ आहे वस्ती उठवायला वेळ लागणार नाही, असा सूचक इशारा देत शिवसेनेचे 80 टक्के जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. काही ठराविक जणांना पक्षात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दिवाळीत उटणे लावण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना