महाविकास आघाडीच्यावतीने 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला सुरुवात होणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत या मोर्चाची सांगता होणार.
खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. २७ ते ३० डिसेंबर दरम्यान भव्य 'शेतकरी आक्रोश मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाची सांगता शरद पवार यांच्या जाहीर सभेने होणार आहे.
या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. मात्र या मुद्द्यावरुन त्यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचं समजते.