मराठा आरक्षणाप्रकरणी राज्यभरात वातावरण गरम होत असतानाच राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून संबंधित माहिती दिली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती. त्यानंतर १६ जूनपासून राज्यात संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यात मूक मोर्चांना सुरुवात झाली. यानंतर अखेर राज्य सरकारने मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यासंदर्भात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.