अमोल धर्माधिकारी | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससी आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पत्रक शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे त्या 86 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याआधी झालेल्या परीक्षेत उत्तर पत्रिकेत प्रश्न दिल्या प्रकरणी विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाल्याने अनेकजण नापास झाले होते. यावर विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका केल्यानंतर न्यायालयाने आयोगाला फटकारल होत. मात्र नुकताच न्यायालयाने 86 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सामावून घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते. या परीक्षेसाठी पूर्व नियोजित उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे शक्य नसल्याने २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
पत्रकात काय ?
राज्यातल्या विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे आयोगाकडून छपाई करण्यात आलेल्या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणं, परीक्षेच्या आयोजनासंदर्भातल्या इतरही बाबींची व्यवस्था करणं अल्पावधीत शक्य होणार नाही. त्यामुळे २९ जानेवारी, ३० जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित विषयांकित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे", असं आयोगाने आपल्या पत्रकात नमूद केलं आहे.