राज्य सरकारकडून शाळा सुरू करणयाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ४ ऑक्टोबरपासून राज्यभरातील शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहेत. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असल्याच्या वृत्ताला शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिलेला आहे.