राज्यात मंगळवारच्या तुलनेत आज किंचित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही कमी आढळली आहे. राज्यात आज 8 हजार 602 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 6 हजार 764 इतकी आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 8 हजार 602 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले.
आज एकूण 6 हजार 067 इतके रुग्ण बरे झाले आहेत. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 44 हजार 801 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के एवढे झाले आहे.तसेच, आज एकूण 170 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. यामुळे राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे.