महाराष्ट्र

Maharashtra MLC Election Result 2021 Live | नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) च्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1 मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

अकोला बुलडाणा वाशिमध्ये चुरशीची लढत?
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा ' जॅकपॉट ' ठरणार आहेत. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघातील पक्षीय बलाबल
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस 190, शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 76 असे एकूण 396 मते आहेत तर 130 तर भाजपाकडे 244 मते आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार आहेत. हे मतदार आपल्या विजयाचा ' जॅकपॉट' बनू शकतात असा समज उमेदवारांना येताच त्यांनी या मतदारांची मनधरणी सुरू केली असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...