राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच डेल्टा प्लसचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टपप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण समोर आले असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याबरोबर कोरोना रुग्णांची रोजची रुग्णवाढही वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना तिसऱ्या लेवलपेक्षा कमी म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना मागील दोन आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीय असं दिसत असेल तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.