राज्यातील कोरोनाची लाट अद्याप ओसरल्याचं चित्र नाही. आकडेवारी मागील तीन महिन्यांच्या तुलनेत कमी असली, तरीही बाधितांची संख्या आणि आणि मृत्यूचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. दिवसेंदिवस मृत्यूचा आकडा समांतर पातळीवर चालत आहे.
आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४७९ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ११० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, आज १५७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६०,९४,८९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.५९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१०,१९४ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३२९८ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.