राज्यातील कोरोना संसर्ग ओटोक्यात आल्याचं चित्र असताना आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.राज्यभरात आज दिवसभरात २ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार ९८ रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर, २२ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
राज्यभरात आज दिवसभरात २ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार ९८ रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर, २२ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. तर, एकट्या मुंबईत १ हजार ३७७ नवीन कोरोनाबाधितांची आज नोंद झाली. तर ३३८ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील अॅक्टीव्ह केसेसची संख्या ५ हजार ८०३ आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०४,८३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत राज्यात १४१४७६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ११,४९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.