महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात ५ हजार ३१ नवीन रुग्ण आढळले; २१६ रुग्णांचा मृत्यू

Published by : Lokshahi News

राज्यभरात अद्याप कोरोना रुग्णांची संख्या ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असताना ही चिंतेची बाब आहे. दिवसभरात राज्यात ५ हजार ०३१ नवीन करोनाबाधित आढळले असून, ४ हजार ३८० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, २१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत ६२,४७,४१४ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,३६,६८० झाली आहे. आतापर्यंत राज्यात १,३६,५७१ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट