महाराष्ट्र

राज्यात दिवसभरात ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; १४५ जणांचा मृत्यू

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र राज्यात आढळून येणाऱ्या कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज राज्यात ४ हजार ७८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत राज्यात ६२ लाख ३१ हजार ९९९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज ४ हजार १४१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १४५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ५३ हजार १८२ बाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२२,९२,१३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२४,६५१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती