राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं सांगितलं जात असलं, तरी देखील अद्यापही दररोज बाधितांची संख्या कायम आहे. याचसोबत कोरोनाग्रस्तांच्या मृत्यू संख्येत दररोज वाढ सुरूच आहे.
आज दिवसभरात राज्यात २२५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. तर, ६ हजार ९५९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ७ हजार ४६७ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ६०,९०,७८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट) ९६.६२ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.