महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात १४८५ नवीन रुग्णांची नोंद

Published by : Lokshahi News

राज्यात १४८५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून २ हजार ५३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज ३८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. कारण, दररोज आढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. आज राज्यात २ हजार ५३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ४३ हजार ३४२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के एवढे झाले आहे.
आज राज्यात १४८५ नवीन रुग्णांचे निदान झाले. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०६,५३६ झाली आहे. राज्यात एकूण १९,४८०ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज ३८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Shraddha Arya: लोकप्रिय सिरियल "कुंडली भाग्य"मधील अभिनेत्रीच्या घरात नव्या पाहुण्याची चाहूल

Navratri 2024: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योति पेटती राहण्यासाठी घ्या "ही" काळजी

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...