राज्यामध्ये १ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३ हजार ३३ रूग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तर, ३६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, कोरोनामधून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. ३ हजार ३३ रूग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,०४,३२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३४ टक्के एवढे झाले आहे.
१ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,७९,६०८ झाली आहे.३६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आजपर्यंत १३९५७८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.राज्यात आज रोजी एकूण ३२,११५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.