महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात १ हजार ७८१ जण कोरोनामुक्त

Published by : Lokshahi News

राज्यात आज १ हजार ७०१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. १ हजार ७८१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, तर, ३३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आज रोजी एकूण २४,०२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात १ हजार ७८१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, आजपर्यंत एकूण ६४,३३,९१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

१ हजार ७०१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत.आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०१,५५१ झाली आहे. ३३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत १३९९९८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती