लोकशाही न्यूज नेटवर्क | राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतली आहे. महाराष्ट्रात या हिवाळ्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे.दरम्यान, अजून आठवडाभर थंडीचा कडाका कायम तर दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
IMD चे मुंबई विभागाचे प्रमुख घोसाळीकर यांनी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये तापमानात बदल होणार असल्याची माहिती दिली.त्यानुसार, पुढचे दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ही कदाचित राज्यासाठी या हंगामातली शेवटची थंडीची लाट असू शकते.मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पारा एक आकडी असू शकतो. म्हणजे 10 अंशाच्या खालीही जाण्याची शक्यता आहे.