महाराष्ट्र

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार! मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

Published by : Shweta Chavan-Zagade

रिफायनरीच्या प्रकल्पावरून आता नवीन आणि महत्त्वाची माहिती समोर येत असून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार रिफायनरीबाबत (Refinery) सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच रिफायनरीसाठी नव्या जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला दिला आहे. तसेच नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) (Maharashtra Nanar Project ) प्रकल्पासाठी आता पर्ययी जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) केंद्र सरकारला ( Central Government) दिल्याचं बोललं जात आहे.

नाणार रिफायनरीला (Nanar Refinery) स्थानिकांचा विरोधात आहे. यामुळे नाणार ऐवजी आता रिफायनरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांचा समावेश आहे. बारसू रिफायनरीसाठी जवळपास १४ हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास २४१४ एक जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मीडिया रिपोर्ट्समधून हे सांगितलं जात आहे.

१३ हजार एकर जमीन राजापूर तालुक्यातील बारसू साठी दिली जाऊ शकते. तसंच नाटे येथील २ हजार एकर समुद्र किनाऱ्याची जमीन बंदर उभारणीसाठी दिली जाऊ शकते, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या जीडीपी ८.५ टक्क्यांनी वाढणार आहे. महाराष्ट्र सरकारने रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक संकेत दिल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं होतं.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती