महाराष्ट्र

Maharashtra assembly: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला

Published by : Lokshahi News

हिवाळी अधिवेशानात पहिल्या दिवसापासून विरोध आक्रमक दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. यावेळी अधिवेशन पुढे किती दिवस घ्यायचं याबाबत चर्चा झाली असून राज्यातील बहुप्रतिक्षीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. त्यानुसार २७ डिसेंबरला या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर २८ डिसेंबरला निवडणुकीसाठीचे मतदान पार पडेल.

या निवडणुकीत भाजपकडूनही आपला उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला महाविकासआघाडी आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी करण्यात आली. अनेक प्रश्नांवर राज्य सरकारने अद्याप उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, असे विरोधकांचे म्हणणे होते. मात्र, राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २८ डिसेंबरला संपेल. याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजासाठी आजचा दिवस धरुन एकूण तीन दिवसच हातात उरतात. इतक्या कमी कालावधीत जनतेच्या समस्या कशा मांडणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

परिवर्तन महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांची टीका; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात

साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जालन्यात मराठा - ओबीसी समाजाचं उपोषण; उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी समाजातील लोकांची गर्दी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली