महाराष्ट्र

Mahaparinirvan Din | प्रवेश नाकारल्याने चैत्यभूमीवर समर्थक भिडले

Published by : Lokshahi News

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन असून यानिमित्ताने सर्व अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान कोरोना संकट असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र यावरुनच चैत्यभूमीवर नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

अनेक अनुयायी आदल्या दिवशीच दादरमध्ये येऊन थांबत असतात. मात्र यावेळी कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने संतप्त अनुयायांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासाठी आत प्रवेश दिला जात नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती