मागील आठवड्यात आलेल्या महापूराने हजारो संसार उध्वस्त केले. महाड तालुक्यात तर हाहाकार उडाला. याच तालुक्यातील काळीजकोंड आदिवासी वस्तीतील बावीस घरे अक्षरशः जमीनदोस्त झाली. आज ही मोडलेली घरे आणि वाहून गेलेला संसार पाहत बसण्यापलीकडे काहीच उरलेले नाही.
अन्नधान्य आणि कपड्यांची तात्पुरती मदत पोहचते. पण शिजवायचे कशावर आणि झोपायचे कुठे या समस्या आहेतच. नदी काठावर वसलेली ही वस्ती कधी ना कधी पुराचा फटका बसणारच होता म्हणूनच गेली तीन वर्षांपासून ही माणसे प्रशासनाकडे सुरक्षित जागेची मागणी करत होते.
मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि आज अखेर ही बावीस घरं जमीनदोस्त झाली. आता तरी डोळे उघडा आणि आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी हे लोक करत आहेत.