नागपूरच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याचीच प्रचिती तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहायला मिळाली. एका तरुणीचे आंघोळ करताना चित्रीकरण करून व्हिडीओचे स्क्रीन शॉट घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
२२ वर्षांची तरुणी सायंकाळीच्या सुमारास आंघोळ करत असताना एका अल्पवयीन तरुणाने तिचा व्हिडीओ काढला. यानंतर त्याने हे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध केले.
संबंधित घटना तरुणीच्या लक्षात येताच पीडितेच्या भावाने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
अटक केलेला आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याच्या पालकांना बोलवून आरोपीवर गुन्हा दाखल केलाय. तसेच सुचना पत्र देऊन त्याला पालकांच्या स्वाधीन केले आहे.