पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती सिलेंडच्या किंमतीत वाढ केल्याने सर्वसामान्यांना आणखी आर्थिक झळ बसणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीतील घरगुती सिलिंडरच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर 859.5 रुपये झाला आहे. ही दरवाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू होणार आहे.
कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 886 रुपये, मुंबईमध्ये 859.5 रुपये, लखनऊ 897.5 रुपये एवढे दर झाले आहेत. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे.