राजकारण

स्मृती इराणींचा आवेश हा नळावरच्या भांडणासारखा; यशोमती ठाकूर यांचा घणाघात

मणिपूरमधील घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद संसदेपासून विधानभवनापर्यंत उमटले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मणिपूरमधील घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद संसदेत उमटले आहेत. अशातच, मणिपूर हिंसाचाराचे खापर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर फोडण्यात आले आहे. यावरुन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चोराच्या उलट्या बोंबा मारू नका, राजधर्माचं पालन करा, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी स्मृती इराणींना सुनावले आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महिला अत्याचाराच्या घटनांवर पक्षीय राजकारण करणाऱ्या स्मृती इराणी यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. मणिपूरच्या घटनेबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले. मणिपूरवर बोलणं टाळण्यासाठी आता भाजपने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांना मणिपूर साठी जबाबदार धरण्याचा कांगावा सुरू केला आहे. काल महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी एखाद्या टीव्ही डिबेट किंवा पक्षाच्या सभेत असल्या सारख्या बोलल्या. त्यांचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा होता, अशी टीका त्यांनी केली.

मणिपूरच्या घटनेवर बोलायची संवेदनशीलता ही या सरकारमध्ये नाही. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार नाही, या विषयावर राजकारण करायचं नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती, ईशान्येकडच्या राज्यांकडे विशेष लक्ष द्या, असं राहुल गांधी नी सांगितलं होतं. मात्र सरकार आता राहुल गांधी यांना या बाबत दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतयं. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, आणि आम्ही या वृत्तीचा निषेध करतो. पंतप्रधान मोदींनी राजधर्म पाळला पाहिजे, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संघ परिवाराशी संबंधित इंडिक टेल ही प्रपोगंडा साइट आहे. या साइटची मालकी सरयू या एनजीओ कडे आहे. ही एनजीओ ही समाजात विष कालणारा मोडका इतिहास पसरवत असते. सावित्रीबाईं वरच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर या वेबसाईटवर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मात्र हा माफीनामा मान्य नाही. या एनजीओ ला आर्थिक रसद पुरवणारे कोण आहेत त्यांची नावे समोर आली पाहिजेत. खोटा इतिहास पेरणाऱ्या या साईटच्या ब्रेन ला अटक झाली पाहिजे. संघपरिवाराशी संबंधित असल्याने कारवाईचं थातूरमातूर नाटक दाखवण्याचा प्रयत्न करून वेळ मारून नेली जात आहे, असाही घणाघात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केला आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी